BREAKING : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड गाडी जाळण्याचा प्रयत्न, बुलडाण्यात खळबळ

माझी गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.

0 49

बुलडाणा, 26 मे : या ना त्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे शिवसेनेचे (Shivsena MLA)आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी महागडी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात (Buldhana)खळबळ उडाली आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या आगीत गाडीच्या मागील भागाने नुकसान झाले आहे.

घटना घडली तेव्हा संजय गायकवाड हे घरी नव्हते. कामानिमिताने संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रकाराने खळबळ माजली आहे

माझी गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. तसंच, राजकीय वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न असावा असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड हे आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत आहे. ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते,’ अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यानंतर बुलडाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.