श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या कोमल झोरेला विद्यापीठाचे सुवर्णपदक

देऊळगाव राजा

0 2

येथील श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल राजेंद्र झोरे हिने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये बी.ए.च्या राज्यशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवून विद्यापीठाचे स्व.आनंदराव यशवंतराव राऊत सुवर्ण पदक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

29 मे रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा 37 वा दीक्षांत समारंभ आभासी पद्धतीने पार पडला. समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कु. कोमल झोरे हिला आभासी पध्दतीने राज्यशास्त्र विषयातील सुवर्ण पदक प्रदान करुन तिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांची उपस्थिती होती. यापूर्वीही महाविद्यालयाच्या कु.सरला डोईफोडे आणि कु.अश्विनी साळवे या विद्यार्थिनींनी राज्यशास्त्र विषयात सुवर्ण पदक पटकावले होते. राज्यशास्त्र विषयात व्यंकटेश महाविद्यालयाच्या एखाद्या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक प्राप्त करण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची व यशाची परंपरा कायम राखली आहे.

कु.कोमल झोरेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, महाविद्यालयाचे आयक्युएसी समन्वयक डॉ.सुधीर चव्हाण, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अनंत आवटी तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कोमल झोरेच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. कोमल झोरे हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अनंत आवटी यांना दिले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.