शिक्षक सेना महिला आघाडीच्यावतीने तालुका अध्यक्ष सुनिल घावट यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन साध्या पद्धतीने

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व गर्दी टाळण्याच्या निर्बंधामुळे तुर्त शिक्षक सेनेचे सामाजिक उपक्रम लांबणीवर

0

शेगांव : रक्ताचे नाते जरी दुरावत असले तरी शिक्षक सेना मित्र परिवाराच्यावतीने मात्र सातत्याने व निरंतर जिव्हाळ्याचे ॠणानुबंध जोपासत वाढदिवसाचे औचित्य साधुन वृक्षभेट देणे, वृक्षारोपण करणे व रक्तदान शिबिरे आयोजित करणे असे आदी सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत आहेत,परंतू सद्यपरिस्थितीतील कोरोना संसर्ग व गर्दी टाळण्यासाठी लागु करण्यात आलेल्या निर्बंधामुळे तुर्त वृक्षभेट देणे, वृक्षारोपन करणे व रक्तदान शिबिर हे सामाजिक उपक्रम कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तुर्त स्थगित करण्यात आलेले आहेत.

शिक्षक सेना महिला आघाडीच्या संघटीका सुषमाताई खेडकर औक्षण करून सुनिल घावट यांचा वाढदिवस साजरा करतांना
शिक्षक सेना महिला आघाडीच्या संघटीका सुषमाताई खेडकर औक्षण करून सुनिल घावट यांचा वाढदिवस साजरा करतांना

आयुष्यातील स्पेशल असणारा वाढदिवस कोरोना संसर्गाच्या सद्यपरिस्थितीमुळे शिक्षक सेना महिला आघाडीच्यावतीने गर्दी टाळण्याचे निर्बंध पाळून व सामाजिक उपक्रम वगळून तालुका अध्यक्ष सुनिल घावट यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.
महिला आघाडी शिक्षक सेनेच्यावतीने उपाध्यक्षा रजनीताई धारपवार, संघटक सुषमाताई खेडकर यांच्या हस्ते वाढदिवसाचे औचित्य साधुन तालुका अध्यक्ष सुनिल घावट यांचा शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ व कुडता पॅन्ट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक सेनेचे तालुका उपाध्यक्षा रजनीताई धारपवार,महिला संघटक सुषमा खेडकर,उर्मिला वडाळ, विनायकराव वडाळ,किशोर मोरे,सचिन वडाळ,सई वडाळ आदीची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.