चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

शहरालगत असलेल्या दूर्गापूर (durgapur chandrapur) येथे जनरेटरमधील गॅस गळतीमुळे (gas leak) 6 जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली असून मृतांमध्ये १० वर्ष आणि ८ वर्षाच्या बालकांचा समावेश आहे.

0 13

चंद्रपूर : शहरालगत असलेल्या दूर्गापूर (durgapur chandrapur) येथे जनरेटरमधील गॅस गळतीमुळे (gas leak) 6 जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली असून मृतांमध्ये १० वर्ष आणि ८ वर्षाच्या बालकांचा समावेश आहे.

अजय लष्कर (२१) रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) , असे मृतांची नावे आहेत. लष्कर कुटुंब कोराडीला गेले होते. सोमवारी सर्वजण कोराडीहून दुर्गापुरातील निवासस्थानी आले. रात्री जेवण आटोपले. यादरम्यान या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे घराच्या आत असलेले जनरेटर लावून हे कुटुंब झोपले. घर बंद होते. त्यामुळे जनरेटरमधून गॅस गळती झाली. त्यात सहा जणांचा मुत्यू झाला. लष्कर कुटुंबाचे नातेवाईक शेजारी राहतात. सकाळी कुणीच उठले नसल्याचे पाहून त्यांनी दार ठोठावले. पण कुणीच दार उघडले नाही. त्यामुळे दार तोडण्यात आले. आत सात जण पडून होते. त्यानंतर सर्वांना विश्वास झाडे हॉस्पीटलमध्ये उपारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, सहा जणांना डॉक्टरांना मृत घोषित केले आणि एकाचे प्राण सुदैवाने वाचले.

Leave A Reply

Your email address will not be published.