मुख्याध्यापकांच्या शालेय पोषण आहारासंदर्भातील विविध समस्या सोडवा

प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी

0

शेगांव : 
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने मुख्याध्यापकांच्या व शिक्षकांच्या प्रशासकीय विविध समस्या सोडविण्याबाबत गटविकास अधिकारी सतिष देशमुख, गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे व शालेय पोषण आहार अधिक्षक एन.डी.खरात यांच्याकडे दि.२ऑगस्ट रोजी निवेदनामार्फत करण्यात आलेली असुन सदर विषयाअंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांनी शाळेवर शालेय वेळेत शासनाने नेमुन दिलेल्या शालेय गणवेशामध्ये शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे असे आदेशित करण्यात आलेले असुन सदर बाबीची पुर्तता करण्यासाठी इतर शासकीय विभागातील कर्मचा-याप्रमाणे गणवेश खरेदीकरिता व देखभाल करण्यासाठी गणवेश धुलाई भत्ता दरमहा अदा करण्यात यावा,आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत तिरंगा ध्वज पुरविण्यात यावेत,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता रिक्त शाळेवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शक्य तितक्या लवकर करण्यात यावे,शालेय पोषण आहार अंतर्गत ऑनलाईन पोर्टलसंदर्भात तांत्रिक अडचणी उद्भल्यामुळे मागील दिवसाची ऑनलाईन माहिती भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.शालेय पोषण आहार अंतर्गत गॅस खरेदी करिता अल्प अनुदान प्राप्त झालेले असल्यामुळे पुरेसे अनुदान अदा करण्यात यावे,शालेय पोषण आहाराची देयके पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने अदा करण्यात यावीत,जिल्हा परिषदेतून मंजुर झालेल्या वैद्यकीय देयकाची रक्कम अदा करण्यासाठी आर्थिक तरतुदीची तात्काळ मागणी करण्यात यावी,शालेय पोषण आहारा अंतर्गत पुर्वी प्रमाणेच सर्व शाळेला पुरवठाधारकामार्फत खाद्यतेलाचा पुरवठा करण्यात यावा आदी प्रलंबित समस्या सोडविण्याची मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुनिल घावट,उपाध्यक्ष विनोद डाबेराव कार्याध्यक्ष सचिन वडाळ, सरचिटणीस अनिल खेडकर,उपाध्यक्ष दिलीप भोपसे,केंद्र समन्वयक सचिन गावंडे,सदस्य अर्जुन गिरी, शिक्षक श्रीकांत झनके,गोवर्धन गवई,कार्यालयीन प्रतिनिधी विक्रम फुसे,विनोद वैतकार व प्रहार शिक्षक संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

मुख्याध्यापकांच्या शालेय पोषण आहारासंदर्भातील विविध समस्या सोडवा
मुख्याध्यापकांच्या शालेय पोषण आहारासंदर्भातील विविध समस्या सोडवा

शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शालेय पोषण आहार अधिक्षक यांना निवेदन सादर करतांना प्रहार संघटनेचे पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.