कोल्हापूर : अखेर नराधम सुनीलला फाशीची शिक्षा, आईचा खून करून भाजून खाणार होता काळीज!

सुनील रामा कुचीकोरवी (Sunil Rama Kuchikorvi) या सैतानाने आपल्या आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती

0 33

कोल्हापूर : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या कोल्हापूरच्या (kolhapur) घटनेचा अखेर निकाल लागला आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आईचा खून करून काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अखेर कोल्हापूर न्यायालयाने (kolhapur court) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

2017 मध्ये दोषी सुनील रामा कुचीकोरवी (Sunil Rama Kuchikorvi) या सैतानाने आपल्या आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणाचा 4 वर्षांनंतर निकाल लागला आहे.कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात  न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली. न्यायाधीशांनी या प्रकरणात सुनील कुणीकोरवीला दोषी ठरवून न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून न्यायालयाने नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोल्हापूरकरांनी समाधान व्यक्त केलं आहे.

काय आहे प्रकरण?

शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 28 ऑगस्ट 2017 रोजी माकडवाला वसाहतीत दोषी सुनील कुचकोरवी याने आपली आई यल्लवा कुचकोरवी (वय 62) यांचा निर्घृणपणे खून केला होता. सुनील दारूच्या आहारी गेला होता. त्याने आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. पण, तीने देण्यास नकार दिल्यामुळे संतापलेल्या सुनीलने आईचा चाकूने सपासप वार करून खून केला होता.

सुनील खून करून थांबला नाही तर त्याने आईला मारून, विवस्त्र केलं, तिचे स्तन कापले, काळीजाचे तुकडे केले होते. गुप्तांगावर धारधार शस्त्राने वार केले होते. एवढंच नाहीतर आईच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर शरीराचे तुकडे नराधमाने फ्रिजमध्ये भरून ठेवले होते. धक्कादायक म्हणजे, आईच्या शरीराचे तुकडे भाजून खाण्याच्या तयारीत होता, त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्याला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.