मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरात दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी घरातून 1.41 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी सोनमच्या सासूने तुघलक रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Hosue of Sonam Kapoor Robbed)
अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या दिल्ली येथील येथील घरी चोरी झाली असून दीड कोटीचा मुद्देमाल चोरांनी लुटला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची कन्या सोनम कपूर हिचे लग्न आणि सध्या सुरु असलेली प्रेग्नेंन्सी यामुळे ती चर्चेत आहे. नुकतेच तिने खास पोहोटोशूट करून घेतले आहे. सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चोरांनी रोकड आणि दागिने चोरले असून दिड कोटींना चुना लावला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, सोनम कपूरच्या सासूने (प्रिया अहुजा) तुघलक रोड पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या घरी दरोडा पडल्याची तक्रार दाखल केली आहे. हे हायप्रोफाईल चोरीचे प्रकरण असून दिल्ली पोलिसांनी यात विशेष लक्ष घातले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सध्या सोनम आणि आनंद यांच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक अहवालानुसार केअरटेकर, ड्रायव्हर, गार्डनर्स आणि इतर कामगारांव्यतिरिक्त एकूण 25 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. फक्त दिल्ली पोलीसच नाही तर ‘एफएसएल’ देखील या प्रकरणाचा शोध घेत आहेत. परंतु अद्याप दोषींचा शोध लागलेला नाही.