कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाइट लँडिंग

कोल्हापूर : विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यापासून कोल्हापूर विमानतळाचा विकास गतीने होत आहे. यामुळे लहान शहरातील विमानतळात कोल्हापूरच्या विमानतळाचा नावलौकिक ...

0 4

कोल्हापूर : विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यापासून कोल्हापूर विमानतळाचा विकास गतीने होत आहे. यामुळे लहान शहरातील विमानतळात कोल्हापूरच्या विमानतळाचा नावलौकिक वाढला आहे. येथे मोठ्या आकाराचे विमान उतरतील. नाइट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू होईल, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी दिली.

मंत्री पाटील बेंगलोरला जाण्यासाठी येथील विमानतळावर आले होते. त्यांनी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्याकडून विमानतळ विकासाची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी विमानतळावरील धावपट्टी वाढवण्याचे काम, त्यासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याच्या प्रशासकीय कामाबद्दल समाधान व्यक्त केले. स्थानिक लोकांशी आणि प्रशासनाशी चांगला संपर्क ठेवून कटारिया यांनी विमानतळ विस्तरीकरणातील अडचणी सोडवल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. त्यांनी कटारिया यांच्या कामाचे कौतुक केले.

ते म्हणाले, कोल्हापूर विमानतळावरून बेंगळूर, तिरुपती, मुंबई, हैदराबाद येथे विमानसेवा सुरू आहे. या शहरांशी संपर्क सोयीचा झाला आहे. विमानतळाचे विस्तारीकरण गतीने होत असल्याने मोठ्या आकाराची विमानेही काही दिवसांतच उतरतील. परिणामी विविध शहरांशी संपर्क होणार आहे.

कोल्हापूर विमानतळावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विमानतळ विकासाची माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी घेतली. या वेळी मंत्री पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.