SBI च्या कर्जदारांना फटका; गृहकर्ज महागणार

State Bank loan is expensive now the loan installment will increase

0

स्टेट बँक ऑफ इंडिया

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही व्याजदर वाढविण्यास सुरूवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एसबीआयने कालपासून कर्ज महाग केलं आहे. निधी आधारित कर्ज दरात किरकोळ खर्च बँकेने वाढवला आहे. बँकेचे नवे दर 15 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. कर्जाचा दर वाढल्याने आता कर्ज महाग होणार आहे आणि ग्राहकांना कर्जाचा ईएमआय पूर्वीपेक्षा जास्त भरावा लागणार आहे.(State Bank loan is expensive now the loan installment will increase)

एसबीआयने एमसीएलआर दरात एक दिवस ते ३ महिने मुदतीसाठी 7.15 टक्क्यांवरून 7.35 टक्के इतकी वाढ केलीय. तर 6 महिन्यांचा एमसीएलआर 7.45 टक्के होता तो आता 7.65 टक्के झाला आहे. दोन वर्षांसाठी 7.7 टक्क्यांवरून 7.9 टक्के इतका केला आहे. तर तीन वर्षांसाठी एमसीएलआर 7.8 टक्के होता तो ८ टक्के इतका करण्यात आला आहे.

आरबीआयने नुकतीच रेपो रेटमध्ये 50 बेसीस पॉइंटची वाढ केली. त्यामुळे अनेक बँकांनी विविध कर्जांच्या दरात वाढ केलीय. एसबीआयने गेल्या आठवड्यात एफडीचे व्याजदर वाढवले. बँकेकडून सर्वसामान्यांना 2.90 टक्के ते 5.65 टक्के व्याज दिलं जातं तर 7 दिवस ते 10 वर्षे एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 3.40 टक्के ते 6.45 टक्के व्याज दिलं जात आहे.

फिक्स डिपॉझिटवर मिळणार अधिक व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘उत्सव डिपॉझिट’ नावाची योजना सुरू केली आहे. या फिक्स्ड डिपॉझिट स्कीममधील व्याजदर सामान्यपेक्षा जास्त आहेत आणि ते मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहेत.

एसबीआयमध्ये नुकतीच 2 कोटींखालील मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. SBI ने 13 ऑगस्ट 2022 रोजी नवीन व्याजदर जाहीर केले. बँकेने विविध कालावधीसाठी व्याजदर 15 बेसिस पॉईंट्सने वाढवले आहेत.

एसबीआयने 180 ते 210 दिवसात मुदत ठेवींवरील व्याजदर 4.40% वरून 4.55% पर्यंत वाढवले ​​आहेत. SBI ने मुदत ठेवींसाठी एक वर्षापासून दोन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या व्याजदरात 5.30% वरून 5.45% पर्यंत वाढ केली आहे. 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीतील ठेवींवरील व्याजदर 5.35% वरून 5.50% पर्यंत वाढला आहे, तर 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 5.45% वरून 5.60% पर्यंत वाढला आहे. SBI ने व्याजदर वाढवला आहे. 5 वर्षे आणि 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.65 टक्के केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.