Whatsapp वर कधीच ‘या’ चुका करू नका, अन्यथा जेलची हवा खावी लागेल

0 92

नवी दिल्लीः सध्या स्मार्टफोन अनेकांकडे असल्याने आपण फोटो, व्हिडिओ पासून टेक्स्ट पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करीत असतो. Whatsapp वर आपण कधी तरी चुकून काही चुका करतो. त्यामुळे डेटा लीक होण्याची भीती असते. त्यामुळे तुम्हाला जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते.

Whatsapp चुकूनही काही मेसेज फॉरवर्ड करू नका
Whatsapp वर २१ दिवसांत पैसे डबल करण्याची स्कीम सारखे मेसेज चुकूनही एकमेकांना पाठवू नका. असे केल्यास तुमचे अकाउंट रिकामे होऊ शकते. व्हॉट्सअॅप मेसेज एन्क्रिप्टेड असतात. त्यामुळे तुम्हाला माहिती हवे की, आपण काय फॉरवर्ड करत आहोत. जर कोणी तुमच्या विरोधात तक्रार दाखल केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. Whatsapp वर धमकी देणे, अश्लील मेसेज आजिबात फॉरवर्ड करू नका, असे केल्यास तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तुम्हाला जेलची हवा खावी लागेल.

फेक अकाउंट बनवू नका
Whatsapp वर फेक अकाउंट बनवून लोकांना त्रास देण्याचे काम करू नका. फेक अकाउंटमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर कोणी असे केले तर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करून त्या व्यक्तीला जेलची हवा खावी लागू शकते.

Whatsapp हॅक करण्याचा प्रयत्न करू नका
जर तुम्ही सॉफ्टवेयर इंजिनियर असाल तर चुकूनही Whatsapp ला हॅक करण्याचा प्रयत्न करू नका. कारण, Whatsapp प्लॅटफॉर्मला हॅक करण्याचा प्रयत्न करणे गंभीर गुन्हा आहे. कंपनी तुम्हाला लीगल नोटीस पाठवू शकते. कोणत्याही धर्माच्या विरोधात धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज फॉरवर्ड करू नका. असे केल्यास तुम्ही चांगलेच अडचणीत येऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.