चिमूर, भिसी मुख्य मार्गावरील पथदिवे मागील पाच दिवसांपासून बंद

संबंधित विभागाने लक्ष देण्याची नागरीकांची मागणी

0

चिमूर-

येथील चिमूर, भिसी कॉर्नर मेन रोड वरील पथदिवे मागील पाच दिवसांपासून बंद असून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अंधार पसरलेला असतो ह्या मार्ग भिसी कडे जाणारा मार्ग तसेच चिमूर कडे जाणारा मुख्य मार्ग असल्यामुळे रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात टिप्पर चालत असून टू व्हीलर वाहन धारक तसेच पायदळ चालनारे नागरिकांना अपघात होण्याची शक्यता वर्तवली आहे,

तसेच जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे पाच दिवसापासून बंद असलेले पथदिवे संबंधित विभागाने लक्ष देऊन सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.