आयुषी आणि पियुष वानखडे भावंडांचे इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाडच्या परिक्षेमध्ये नेत्रदीपक यश

शिक्षक सेनेच्यावतीने दोन्ही भावंडाचा शैक्षणिक यशाबद्दल सन्मान

0

शेगांव :नुकत्याच जाहीर झालेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाडच्या परिक्षेमध्ये स्थानिक माऊली स्कुल आॅफ स्काॅलर येथे इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेली आयुषी वानखडे व इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला पियुष वानखडे या दोन्ही भावंडांनी नेत्रदीपक यश प्राप्त केल्याने त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.

कु.आयुषीने या परीक्षेत 40 पैकी 39 गुण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक प्राप्त केला असून सर्टिफिकेट ऑफ आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स प्राप्त केले आहे. शिवाय बक्षिसाच्या रुपात एक हजार रुपये तिने तर्फे जिंकलेले आहेत व याच परीक्षेत वर्ग आठवीतून पियुष वानखडे या विद्यार्थ्यांने सुद्धा नेत्रदीपक यश मिळवत गोल्ड मेडल मिळवून आपल्या आई-वडिलांचे ,शाळेचे व शिक्षकांचे नाव लौकिक केले आहे.

इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाडच्या परिक्षेमध्ये कु.आयुषी गजानन वानखडे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक प्राप्त केला.

आयुषी आणि पियुष हे शिक्षक सेना तालुका अध्यक्ष गजानन वानखडे यांची सुकन्या व चिरंजीव असून आई नितल वानखडे यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर या दोघा भावडांनी हे यश प्राप्त केलेले आहे.
आयुषी आणि पियुष हे माऊली स्कूल ऑफ स्कॉलर शेगावचे विद्यार्थी असून माऊली चे चेअरमन ज्ञानेश्वरदादा पाटील,प्राचार्य मृणालताई पाटील, यांच्यासह सर्व माऊली परिवाराने सुद्धा या दोघा भावंडाचे अभिनंदन केले आहे.डिझायर कोचिंग क्लासेसचे दांडगेसर यांचे सुद्धा या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलेले आहे.

पियुष वानखडे या विद्यार्थ्यांने यापूर्वी सुद्धा इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ओलंपियाडच्या परिक्षेसह शिष्यवृत्ती परिक्षा व नवोदय विदयालय प्रवेश परिक्षेमध्ये सुद्धा नेत्रदिपक यश संपादन केलेले आहे.

शिक्षक सेना शेगावचे अध्यक्ष सुनील घावट यांनी दोघा भावंडाचं या यशाचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केलेला आहे.
शिक्षक सेनचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रमोद पवार, जिल्हा संपर्कप्रमुख रवि वाघ सर जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे जिल्हा सरचिटणीस प्रवीण वायाळ यांच्यासह संपूर्ण जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हा पदाधिकारी यांनी सुद्धा या भावंडांच्या यशाबद्दल अभिनंदन करून आईवडील या उभयतांचे अभिनंदन केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.