शाळांना सुट्ट्या, पुढील शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू होणार

महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना, सैनिकी शाळांना, कनिष्ठ महाविद्यालयांना (अकरावी आणि बारावी) १ मे २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुट्टी असेल.

0 23

मुंबई : महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना, सैनिकी शाळांना, कनिष्ठ महाविद्यालयांना (अकरावी आणि बारावी) १ मे २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुट्टी असेल. नवे शैक्षणिक वर्ष (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) १४ जून २०२१ पासून सुरू होईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले. summer vacation declared for schools in maharashtra

उन्हाळी सुट्ट्या आणि नवे शैक्षणिक वर्ष या संदर्भात शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. विदर्भातील जूनच्या उकाड्याचा विचार करुन तिथल्या शाळा २८ जून २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुट्टी आणि नव्या शैक्षणिक वर्षाबाबतचा निर्णय राज्यातील सर्व अनुदानीत, विनाअनुदानीत शिक्षण संस्थांना लागू आहे.

उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीचे दिवस कमी करुन त्या बदल्यात निवडक जिल्ह्यांमध्ये गणोशोत्सव आणि नाताळसाठी सलग काही दिवसांची सुट्टी दिली जाते. या संदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.  सध्या राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय हे सध्या बंद आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून महिन्यात होणार आहे. मात्र या संदर्भातील अंतिम निर्णय तत्कालीन कोरोना संकटाच्या स्थितीचा आढावा घेऊन नंतर जाहीर केला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.