सनी लियोनीची ५ वर्षांची मुलगी ‘निशा’ने असे काय केले की सोशल मीडियावर होते आहे कौतुक, जाणून घ्या

सनी लियोनीचा पती डॅनियल वेबरला अलीकडेच आपल्या तिन्ही मुलांबरोबर एअरपोर्टवर पाहण्यात आले. यावेळी त्याची मुलगी निशा हिने जे काही केले त्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होते आहे.

0 39

नवी दिल्ली : सनी लियोनी आपल्या मुलांच्या पालनपोषणावर विशेष लक्ष देते. आपल्या मुलांकडे तिचे (Sunny Leone) बारकाईने लक्ष असते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. सनी लियोनीचा पती डॅनियल वेबरला अलीकडेच आपल्या तिन्ही मुलांबरोबर एअरपोर्टवर पाहण्यात आले. यावेळी त्याची मुलगी निशा हिने जे काही केले त्यामुळे सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक होते आहे.

निशाचा व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये डॅनिलयल जेव्हा कारमधून आपल्या तिन्ही मुलांना घेऊन उतरतात तेव्हा एका हाताने निशाला पकडतात आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्या मुलाला. त्यांचा दुसरा मुलगा याचवेळी पुढे जात होता, तेवढ्यात निशाने त्याचा हात पकड त्याला आपल्याबरोबर उभे केले. त्यानंतर निशाने स्वत:चा मास्क व्यवस्थित केला आणि भावाचा हात पकडत त्याच्यासोबत उभी राहिली.

निशावर कौतुकाचा वर्षाव

निशाला हे सर्व करताना पाहून, भावाची काळजी घेताना पाहून व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तिचे कौतुक केले जाते आहे. निशा आपल्या भावाची किती काळजी घेते, यावर फॅन प्रतिक्रिया देत आहेत. निशा एक चांगली मोठी बहीण आहे अशी प्रतिक्रिया काहीजण देत आहेत तर सनी लियोनी आणि डॅनियल यांनी निशावर चांगले संस्कार केले आहेत, अशी प्रतिक्रिया काहीजण देत आहेत.

जबाबदार जोडपे

सनी लियोनी आणि डॅनियल हे जोडपे आपल्या मुलांची पूर्ण काळजी घेत असतात. दोघेही आपापले काम आणि मुलांचे संगोपन या दोन्ही  बाबींचे योग्य व्यवस्थापन करत असतात. आपल्या दोघांपैकी एका तरीने मुलांसोबत राहावे यासाठी दोघेही प्रयत्नशील असतात. याचबरोबर सनी लियोनी आणि डॅनियल दोघेही कामातून वेळ काढून सुट्या काढून मुलांसोबत ट्रिपवर देखील जातात. मुलांचा वाढदिवस असो किंवा कोणताही सण, समारंभ असो सनी लियोनी आणि डॅनियल यांचे कुटुंब एकत्रच साजरे करत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.