Maratha reservation issue : मराठा आरक्षणप्रश्नी आज निकाल

मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

0 9

 नवी दिल्ली : मराठा आरक्षणप्रश्नी आज, बुधवारी सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे.  या निकालाकडे राज्याबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी न्या. अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. एस. अब्दुल नाझीऱ, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. एस. रवींद्र भट यांच्या पीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली.

सामाजिक व आर्थिक मागासवर्ग निश्चितीचा अधिकार राज्य विधिमंडळांना आहे का, या मुद्याबरोबच न्यायालय सहा महत्त्वाच्या मुद्यांचा विचार करून निकाल जाहीर करणार आहे. त्यात आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादाभंगाच्या मुद्याचाही समावेश असेल. अनेक राज्यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा आधीच भेदलेली आहे. परिणामत: मराठा आरक्षण निकालाचा देशव्यापी आरक्षणावर परिणाम होईल. त्यामुळे न्यायालयाचा निकाल दूरगामी परिणाम करणारा असेल, असे मानले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.