Team Indian New Jersey : T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच, पहा Photo
Team Indian New Jersey : ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात टी-20 वर्ल्ड कप खेळल्या जाणार आहे. यासाठी भारताने नवीन जर्सी लाँच केली आहे. जर्सीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या नवीन जर्सीत पोज देताना दिसत आहे. भारतीय संघाला T20 विश्वचषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
भारतीय संघाला पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने नवी जर्सी आज लाँच केली आहे. या संघाच्या नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संघाची ही नवीन जर्सी निळ्या रंगाची आहे. या जर्सीमध्ये तीन स्टार आहेत. त्याचवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा या जर्सीत पोज देताना दिसत आहे. भारतीय संघ टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

To every cricket fan out there, this one’s for you.
Presenting the all new T20 Jersey – One Blue Jersey by @mpl_sport. #HarFanKiJersey#TeamIndia #MPLSports #CricketFandom pic.twitter.com/3VVro2TgTT
— BCCI (@BCCI) September 18, 2022
भारतीय संघाच्या T20 विश्वचषक 2022 साठी लाँच करण्यात आलेल्या नवीन जर्सीमध्ये तीन तारे आहेत. थ्रीस्टार भारतीय संघाने तीन वेळा जगज्जेतेपद पटकावल्याची ही खूण आहे. भारतीय संघाने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथम विश्वचषक जिंकला होता. T20 विश्वचषकाच्या पहिल्या सत्रात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या दोन विश्वचषकांनंतर भारतीय संघाने 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ (India squads T20 World Cup 2022) –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर
T20 विश्वचषकासाठी भारताचे पूर्ण वेळापत्रक-
- 17 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (सराव सामना)
- 19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड (सराव सामना)
- 23 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
- 27 ऑक्टोबर – भारत वि A2
- 30 ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- 2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश
- 6 नोव्हेंबर – भारत विरुद्ध B1
Team Indian New Jersey,
T20 वर्ल्ड कप,
Team India ,
team india players,T
eam India SquadICC,
Mens T20 World Cup,
T20 World Cup squad,
T20 World Cup Team