‘तारक मेहता..’ मध्ये दिशा वकानीची पुन्हा एण्ट्री, असित कुमार मोदींची सकारात्मक प्रतिक्रिया

जाणून घ्या काय म्हणाले असित कुमार मोदी

0 0

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, चंपकलाला, तारक मेहता ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ३ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी यावर खुलासा केला आहे.

‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत असित कुमार मोदी यांनी दयाबेनला पुन्हा एकदा मालिकेत पाहता येईल या वर वक्तव्य केलं आहे. “दया भाभीची प्रतिक्षा करून प्रेक्षक आता थकले असून त्यांना तिला पुन्हा एकदा मालिकेत पाहायचे आहे. एवढंच नाही तर दयाबेनला पुन्हा एकदा शोमध्ये पाहण्याची माझी सुद्धा इच्छा आहे. परंतु करोनाच्या संसर्गाच्या काळात अनेक गोष्टी शक्य नसल्याने प्रेक्षकांनी आम्हाला पुढचे २ ते ३ महिने पाठिंबा दिला पाहिजे. माझी परस्थिती प्रेक्षकांनी समजुन घेतले पाहिजे अशी मी विनंती करतो,” असे असित कुमार मोदी म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. त्यावर असित कुमार मोदी म्हणाले, “आम्ही प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा तीच कहाणी दाखवू शकत नाही. कारण चॅनेलवर सिटकॉमचे रिपीट टेलिकास्ट आहेत आणि प्रेक्षकांकडून त्यांना तितकीच पसंती मिळते आहे. असं असेल तर पुन्हा पुन्हा एकाच प्रकारची कहाणी दाखवली तर आम्ही पकडले जाऊ, आणि हे आम्हाला परवडत नाही. आम्ही दिवस रात्र काम करतो. मालिकेचे लेखक पुन्हा तिच गोष्ट दिसली नाही पाहिजे या साठी खूप प्रयत्न करतात. हेच कारण आहे की गेल्या १३ वर्षांपासून आम्ही सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहोत.”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंज करत आहे. या मालिकेने आता पर्यंत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. त्यात गेल्या ३ वर्षांपासून या मालिकेत नसलेली दिशा वकानी पुन्हा एकदा मालिकेत येणार अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहे. असित कुमार मोदी यांच्या अशा वक्तव्यामुळे सगळ्या चाहत्यांना तर आता आशा लागली आहे की लवकरच दयाबेन त्यांनी मालिकेत दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.