राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे खाते उघडण्यासंदर्भात शिक्षकांना सक्ती करण्यात येणार नाही.

वेतन विलंबाला एनपीएस खाते उघडण्याचा यथार्थ अडथळा नाही

0 21

बुलडाणा :
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन एप्रिल महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेले नसल्यामुळे डिसीपीएस धारक शिक्षकांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत खाते उघडण्याच्या प्रक्रियेमुळे वेतन अदा करण्यासंदर्भात विलंब होत असावा असा तर्क जिल्हयातील शिक्षकांनी केलेला होता,परंतु सचिन जगताप शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) सचिन जगताप यांनी २३ एप्रिल रोजी ऑनलाईन झुम सभा घेतली असता सभेमध्ये वेतनाचा व डिसीपीएस धारक शिक्षकांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे खाते उघडण्यासंदर्भात यथार्थ मुळीच संबंध नसुन उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे जिल्हयातील शिक्षकांचे वेतन अदा करण्यासंदर्भात विलंब होत आहे सदर तांत्रिक अडचण दूर करून लवकरच वेतन अदा करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती सभेमध्ये विशद केली आहे.

सदर ऑनलाईन झुम सभा जिल्हा परिषदेचे उपमुख्य वित्त व लेखाअधिकारी राठोडसाहेब,उपशिक्षणाधिकारी उमेश जैन व गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षकांचे वेतन व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ( एनपीएस) या विषयासंदर्भात जिल्ह्यातील विविध संघटनेचे जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे डिसीपीएस धारक शिक्षकांना खाते उघडण्यासंदर्भात प्रशासनाच्यावतीने कोणतीही सक्ती शिक्षकांना करण्यात येणार नसुन अद्यापपर्यंत परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन (डिसीपीएस) योजनेअंतर्गत कपात झालेल्या डिसीपीएस धारक शिक्षकांना सन २०१९ ते २०२१ या आर्थिक वर्षाचा हिशोब लवकरच संघटनांनी केलेल्या मागणीनुसार देण्यात येणार आहे तसेच सन् २०१८ या आर्थिक वर्षातील हिशोबाच्या त्रुटीचीही पुर्तता तात्काळ करण्यात येणार आहे.

ज्या शिक्षकांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत कपात न झालेल्या शिक्षकांच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी संबंधितावर निश्चित करण्यात येणार आहे,आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या हिशोबासंदर्भात तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन (एनपीएस ) संदर्भात येणा-या अडचणीबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे असे आश्वासन ऑनलाईन झुम सभेमध्ये उपस्थित अधिकारी यांनी याप्रसंगी दिले आहे.

याप्रसंगी राज्यस्तरीय भूमिका व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला (एनपीएस) सदर योजना शिक्षकांच्या हिताची नसल्यामुळे सदर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला असहमती दर्शवून जिल्हा प्रशासनाशी चर्चेतुन संघटनेची भूमिका विशद करण्यात आलेली आहे . सर्व संघटनांच्या जिल्हा पदाधिका-यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला (एनपीएस) पुर्णत: विरोध दर्शविलेला आहे.

रवि वाघ, प्रवीण बाहेकर ,शिवाजी खुडे,रवींद्र नादरकर ,सुभाष देवकर ,प्रवीण वायाळ, सोमकांत साखरे, शरद नागरे, अविनाश सुरळकर,मंगेश बोरसे व राज्यप्रवक्ते शिवाजी खुडे हे चर्चेमध्ये सहभागी झालेले होते असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुनिल घावट यांनी कळविले आहे.

एनपीएस योजनेत कर्मचारी सेवानिवृत्त किंवा मयत झाल्यास या योजनेत कोणता लाभ मिळणार या बाबत स्पष्टता देण्यात यावी,एनपीएस योजना शेयर मार्केटवर अवलंबून असल्याने कर्मचा-यांचे होणारे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील याची स्पष्टता नाही.एनपीएस योजना तसेच एनएसडील संस्था या योजनेतून कर्मचारी यांना निश्चित रिटर्न देण्यासंदर्भात कोणतीही हमी घेत नाही.उपरोक्त संदर्भात स्पष्टता होईपर्यंत तसेच डिसीपीएस योजनेचा पूर्ण हिशोब मिळेपर्यंत एनपीएस खाते काढण्यासंदर्भात सक्ती करण्यात येऊ नये.

– मंगेश भोरसे
समनव्ययक, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क लढा सेना

Leave A Reply

Your email address will not be published.