थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क घातला नाही म्हणून १४,२७० रुपये दंड, गव्हर्नरनेच केली होती तक्रार

थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क घातला नाही म्हणून सहा हजार बाथ म्हणजे १४,२७० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे

0 3
बँकॉक : थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क घातला नाही म्हणून सहा हजार बाथ म्हणजे १४,२७० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे थायलंडच्या गव्हर्नरनेच त्यांची तक्रार केली होती.

थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत चान-ओ-चा यांनी व्हॅक्सीन खरेदीसाठी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीत त्यांनी मास्क घातला नव्हता. विशेष म्हणजे बाकी सर्वांनी मास्क घातला होता.

थायलंडची राजधानी असलेल्या बॅँकॉकमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे बॅँकॉकचे गव्हर्नर असविन क्वानमुआंग यांनी पंतप्रधानांचीच तक्रार केली. त्यांनी याबाबत सोमवारी फेसबुक पोस्टही केली होती.

त्यानंतर पंतप्रधानांच्या कृतीवर टीका झाली. फेसबुकवर त्यांचा विनामास्क बसलेला फोटोही व्हायरल झाला. त्यानंतर पोलीसांनी पंतप्रधानांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंड वसूल केला.

थायलंडमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. त्यामुळे संपूर्ण बॅँकॉकमध्ये मास्क घालणे बंधनकारक आहे. आता भारतीय प्रवाशांनाही याठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.