जुन्या भांडणाचा राग, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची हत्या, पाच आरोपींना काही तासातच अटक

0 3

भाविक शिंदे आपल्या काही मित्रांसोबत शिव मंदिर परिसरात बसलेला असताना तिथे आलेल्या काही जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन भाविकला मारहाण केली होती. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली होती.

अंबरनाथ : अंबरनाथममधील तरुणाच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला. पोलिसांनी काल दुपारपर्यंत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. 21 वर्षीय भाविक शिंदेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री घडली होती. (Thane Ambernath 21 years old Bhavik Shinde Murder five accuse arrested)

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पूर्वे भागातील शिव मंदिर परिसरातील शाळेजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली होती. भाविक शिंदे हा उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील ब्राम्हणपाडा भागात राहणारा होता. भाविक शिंदे आपल्या काही मित्रांसोबत शिव मंदिर परिसरात बसलेला असताना तिथे आलेल्या काही जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन भाविकला मारहाण केली होती. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली होती.

मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाविकचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. यानंतर हत्येच्या तपासादरम्यान अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास अटक केली.

हत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध

यापैकी चौघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग होता का? तसंच भाविकांची हत्या नक्की जुन्या भांडणांच्याच वादातून झाली का? याचा तपास आता शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.