बेळगाव:अजब! देवाच्या घोड्याचा मृत्यू, अंत्ययात्रेवेळी तुफान गर्दी; सर्वांची होणार कोरोना चाचणी

14 दिवस सीलडाऊन आणि गुन्हा दाखल

0 46

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील मरडीमठ येथे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील शेकडो लोक उपस्थित होते. कोरोनामुळे एकीकडे लाॅकडाऊन असताना 400 ते 500 गावकरी जमले होते. शनिवारी रात्री देवाला सोडलेल्या घोड्याचे निधन झाले.

कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्यासाठी सोडण्यात आला होता घोडा
मरडीमठात पवाडेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा घोडा सोडण्यात आला होता. निधनानंतर देवाच्या घोड्याच्या अंत्यदर्शनासाठी शेकडो लोक जमले होते. मरडीमठ आणि कोन्नूर ग्रामस्थांनी मिळून या देवी घोड्याचे अंत्यसंस्कार केले. बुधवारी मध्यरात्री 12 ते गुरुवारी सकाळी 4 वाजेपर्यंत हा घोडा सोडण्यात आला. देवी घोडा कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्यासाठी सोडण्यात आला होता.

अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वांची अँटीजेन टेस्ट होणार
पूर्वी मलेरिया आणि प्लेग यासारख्या साथीच्या रोगांचे निवारण होण्यासाठी असे घोडे देवाला सोडले जात असत. 51 वर्षांपूर्वी मठात रात्रीच्या वेळी संचारासाठी घोडा सोडण्यात आला होता. दरम्यान, अंत्ययात्रेवेळी गर्दी करु नका असं सुरुवातीला आवाहन केले होते. मात्र, अंत्यविधीला हजारोहून अधिक गावकरी उपस्थित असल्याने आयोजकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मरडीमठही 14 दिवस सीलडाऊन करण्यात आले आहे. बेळगावचे एसपी लक्ष्मण निंबरागी म्हणाले की, जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील मरडीमठ येथे दैवी घोडाच्या अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.