मोठी बातमी, कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासांत मागे!

या काळात जनता कर्फ्यू (Janata curfew) म्हणजेच संचारबंदी लागू असणार आहे.

0 2

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये कोरोनाचा (Coronavirus)संसर्ग तोडण्यासाठी 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा (Strict lockdown in Kolhapur)निर्णय घेण्यात आला होता. पण जिल्ह्यात आजपासून लागू केलेला कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे. लॉकडाऊन नाही, मात्र जनता कर्फ्यु पाळण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं पहायला मिळत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यानुसार आता 5 मे 2021 रोजी सकाळी 11  वाजेपासून ते 13 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात जनता कर्फ्यू (Janata curfew) म्हणजेच संचारबंदी लागू असणार आहे.

मात्र, कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे. लॉकडाऊन नाही, मात्र जनता कर्फ्यु असणार आहे.  आज सकाळी 11 वाजल्या पासून नवे निर्बंधलागू होणार होते. मात्र सायंकाळी पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय मागे घेत केलं.

दरम्यान,  राज्यात सध्या 15 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर आता जिल्हा पातळीवर कडक लॉकडाऊन लावले जात आहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 568 वर पोहोचली असून सोमवारी 40 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.