आरोग्य विभागाची कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाची मोहिम जोमात सुरू

0 9

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण शिबिर भास्तन येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये भास्तन ५७,भोनगाव ८,बोडगाव २,शेगाव २ असे एकुण ६९ ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिशिल्ड लसीचे लसीकरण यशस्वीपणे पार पाडण्यात आले.
याप्रसंगी सरपंच मिरगे,मुख्याध्यापक सुरेश अंबलकर उपस्थित होते,आरोग्य सेविका सेविका अंजली सोनार यांनी लस टोचणी कार्य केलें, डॉ.ललित राठोड यांनी लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांचे निरीक्षण केले आरोग्य सहाययक आर.पी. निखाडे व आरोग्य सेवक सतीश भोंबडे यांनी लसीकरण शिबिरामध्ये लसीकरण नोंदणीचे कार्य केले तर आशा सेविका उजवला मिरगे,अंगणवाडी सेविका मिरगे यांनी लसीकरणासंदर्भात जनजागृती करून जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्यासाठी मदत केली,सदर लसीकरण शिबिरामध्ये पोलीस स्टेशन जलंबचे कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीच्या लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करतांना आरोग्य विभागातील कर्मचारी

कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीच्या लसीकरण लाभार्थ्यांची नोंदणी करतांना आरोग्य विभागातील कर्मचारी

Leave A Reply

Your email address will not be published.