कठोरा केंद्रातील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण परिषद संपन्न

0

शेगांव : 
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कठोरा केंद्राची शिक्षकांची शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सगोडा येथे सेवाज्येष्ठ मुख्याध्यापक राजेंद्र नावकार यांच्या अध्यक्षतेखाली व उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,मुख्याध्यापक अंनतराव वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण परिषद संपन्न झाली.
शिक्षण परिषदेमध्ये प्रभारी केंद्रप्रमुख प्रमोद इंगळे यांनी गटकृतीमुळे वर्गात होणारे बदल,नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण,प्रशासकीय विषय,प्रत्येक मुलाची वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या विषयात प्रभुत्व पातळीकडे वाटचाल व्हावी व सर्व मुलांना इयत्तानुरूप किमान अपेक्षित क्षमता प्राप्त व्हाव्यात या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमाची आखणी करणे,त्या अनुषंगाने वर्गातील प्रत्येक मुलाच्या संपादणूक पातळीत वाढ करण्यासाठी शिक्षकांना मदत आणि प्रेरणा देणे हा शिक्षण परिषदेचा हेतू असल्याचे सांगून शिक्षकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी केंद्रातील सुरेश डोसे,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी,अनिल केसकर, मिनाक्षीताई जुनघरे,ज्ञानेश्वर ताठे,दिलीप भोपसे,अनिल खेडकर, ज्ञानदेव वानरे,जीवन ढोलवाडे,ज्ञानदेव भाबेंरे,राजेश बावणे,अन्नपुर्णाताई अंभोरे,नंदकिशोर ढाकरे,विष्णू घोगले,प्रफुल्ल भोंडे,मनोहर उबंरकर, विरोचन जाधव,संजय लंके आदी शिक्षकांची उपस्थिती होती.
सगोडा शाळेचे शिक्षक माणिकराव देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

शिक्षण परिषदेमध्ये मार्गदर्शक केंद्रप्रमुख प्रमोद इंगळे व उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षक वृंद

Leave A Reply

Your email address will not be published.