पुणे : बाथरूममध्ये कोंडून ज्येष्ठ दांपत्याला लुटले , पुण्यातील धक्कादायक घटना; 16 लाखांचा ऐवज लंपास

पुण्यातील धक्कादायक घटना

0 14

पुणे : ज्येष्ठ दांपत्य आणि त्यांच्या स्वयंपाक्याला चाकूच्या धाकाने बाथरूमध्ये कोंडून 15 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. The eldest couple was locked in the bathroom and robbed in pune

औंधमधील उच्चभ्रू वर्दळीच्या सिंध सोसायटीत रविवारी रात्री ही घटना घडली. बाथरूमचा दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर त्यांनी मुलास फोन करून कळविल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. महिलेने चतुःशृंगी ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तीन व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

औंध येथील सिंध सोसयाटीतील बंगला क्रमांक 817 मध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास स्वयंपाक्याला तीन जण येत असल्याचे दिसले. त्यांना हटकल्यानंतर ते घरात घुसले. त्यांनी त्याच्या पोटाला चाकू लावून पैशाची विचारणा केली. त्यानंतर चोरटे त्याला घेऊन पहिल्या मजल्यावरील बेडरूमध्ये गेले. ज्येष्ठ महिलेला पैसा-पैसा द्या म्हणत गळ्याला चाकू लावला. त्यानंतर त्यांची पर्स हिसकावून पैसे घेतले.

दुसऱ्या व्यक्तीने महिलेच्या पतीच्या गळ्याला चाकू लावून ‘पैसे किधर रखे है’ असे विचारले. पतीला मारहाण केली. त्यावेळी महिलेने बेडरूमचे कपाट उघडून दिले. चोरट्यांनी ऐवज काढून घेतला. तिघांस बाथरूमध्ये बंद केले. त्यानंतर कपाटातले 70 हजार रूपये, सोन्याचे व हिऱ्याचे दागिने, डॉलर असा 15 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज चोरून पळ काढला.
पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.