पावसाने घर पडल्याने भिंती खाली दबून बलिकेचा मृत्यू

तीन जण गंभीर जखमी मेहकर, 

0 2

तालुक्यातील डोणगांव पासून जवळच असलेल्या ग्राम अंजनी बु येथे 8 जूनच्या रात्री झालेल्या पावसात मनवर खा पठाण यांचे घर पडल्याने भिंती खाली दबून 3 वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.

अंजनी बु येथील मनवर खा मस्तान खा पठाण वय 52 वर्ष यांचे राहत्या घराच्या भिंती 8 जूनच्या रात्री आलेल्या पावसात पडल्या. यात आशिया बी अकबर खा पठाण वय 3 वर्ष ही चिमुरडी भीती खाली दबली होती तेव्हा तिला बाहेर काढून उपचारा साठी औरंगाबाद येथे नेत असतांना रस्त्यात बीबी गावाजवळ तीची प्राणज्योत माळवली. तर या घरात असणारे हसीना बी मनवर खा पठाण (वय 47 वर्ष), मनवर खा मस्तान खा पठाण (52), इम्रान खा मनवर खा (27) तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती महसूल विभागाला मिळाल्यावर तलाठी वंदना नाईक यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. पावसाने घर पडल्याने घराचे व घरातील संसार उपयोगी साहित्य असे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले. लहान बालिकेचा भिंती खाली दबून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.