दोनशे फुट उंच पुलावर अडकलेल्या मुलाचे वाचवले प्राण

0 6

बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील खिरोडा गावाजवळ दोनशे फुट उंचीच्या पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या पुलावर खिरोडा येथील १२ वर्षीय मयुर हिवराळे कबुतर पकडण्यासाठी चढला. मात्र उतरता येत नसल्याने तो वरच अडकला व पुलाची उंची पाहून घाबरला. मयुर ४ तासापासून अडकून पडल्याची बाब टायगर ग्रुपला समजली. टायगर ग्रुपने रेस्क्यू ऑपरेशनद्वारे जिवाची पर्वा न करता १२ वर्षीय मयुर हिवराळे याला सुखरूप खाली उतरविले.

Leave A Reply

Your email address will not be published.