‘तुमच्यामुळे कोरोना पसरला’ म्हणत शेजाऱ्याने नर्सिंग स्टुडंटवर चाकूने केला वार

0 18

बंगळुरू : कोरोनाने ग्रस्त रुग्णांना वाचवण्यासाठी मेडिकल वर्कर्स दिवसरात्र झटत आहे. अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसने यात आपला जीव गमावला आहे. पण त्यांच्या या बलिदानाला काही लोक समजून घेण्यास तयार नाहीत. काही लोक त्यांच्यावरच कोरोनाचा प्रसार करत असल्याचा आरोप करत हल्ले करत आहेत.

अशीच एक घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या लक्ष्मीपुरम भागातून समोर आली आहे. लक्ष्मीपुरमच्या इंदिरानगर भागात तीन लोकांनी एका २० वर्षीय नर्सिंग स्टुडंट आणि तिच्या वडिलांवर हल्ला केला. हल्लेखोरांना वाटत आहे की, त्यांच्या भागात नर्सिंग स्टुडंट आणि तिच्या परिवारामुळेच कोरोना पसरला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या आरोपींविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.

याप्रकरणी ज्या लोकांविरोधात एफआयआर नोंदवली गेली आहे त्यांची नावे प्रभू, त्याचा भाऊ अर्जुन आणि भाचा राम अशी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.