दारूची तलब आल्याने करोनाबाधिताने रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून मारली उडी

सुदैवाने बचावला; कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ

0 1

विरार पूर्वेकडील नारंगी येथील एका खासगी रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाने दारूची तलब आल्याने रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून शौचालयाच्या काचा काढून खिडकीतून उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

करोनाची लक्षणं आढळून आल्याने या रूग्णास १४ एप्रिल रोजी वेलक्युअर मल्टी स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास शौचालयास जातो असे त्याने सांगितले.

मात्र डॉक्टरांनी त्याला जाण्यास मनाई केली असताना,  कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन तो शौचालयात गेला. यावेळी बाहेर वार्ड बॉय उभा होता. दरम्यान, त्याने  हळूच शौचालयाच्या खिडकीच्या काचा काढून पळून जाण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली.

मात्र उडी मारल्याचा आवाज आल्याने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन त्याल पकडून रूग्णालयात आणले. सुदैवाने त्याचा वाचला.

Leave A Reply

Your email address will not be published.