जनतेची कोविडलसीकरनाकडे पाठ

0 72

 

शंकरपूर : परिसरात अल्प प्रतिसाद शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणकडे जनतेने पाठ फिरवली असून दिवसातून चार ते पाच जण लस्सी करण्यासाठी येत आहे त्यामुळे अजूनही लोकांमध्ये लसीकरणची भीती असल्याचे जाणवत आहे शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये 28 गावी येत असून 28 गावासाठी शंकरपूर येथे कोविडं लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ज्यांचे वय 45 वर्षाच्या वर आहे अशा जनतेने लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे परंतु या लसीकरणकडे शंकरपूर व परिसरातील जनतेने पाठ फिरवलयाचे निदर्शनास येत आहे 31 मार्च पासून येथील लसीकरण सुरू असून 19 एप्रिल पर्यंत या 20 दिवसात फक्त 560 लोकांनी लसीकरण केलेला आहे तर महसूल कर्मचारी 31 आणि आरोग्य कर्मचारी 11 यांनी लसीकरण केलेले आहे परिसरात 28 गावात हजारो लोक 45 वर्षाच्या वर आहेत तरीपण ते लसीकरणासाठी का येत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे तसेच ग्रामपंचायत च्या वतीने गावात लसीकरण करण्यासाठी जनतेने स्वतःहून पुढाकार घ्यावा यासाठी दररोज दवंडी दिली जात आहे इतकच नाहीत ही दवंडी संपूर्ण 28 गावात दिली जात आहे परंतु 28 गावातले 45 वर्षावरील लोक लसीकरणासाठी येत नाही 28 गावातील आशा वर्कर हे घरोघरी जाऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित करीत आहेत परंतु त्यांनाही कोणताच प्रतिसाद मिळत नाही त्याच्यामुळे या लसीकरणाविषयी लोकांच्या मनात भीती असावी असा संशय बळावला जात आहे (कोविड लसीकरण जनतेच्या आरोग्यासाठी आहे हे लसीकरण केल्यास कोविड आजार होण्याची शक्यता कमीच असते झालाच तरी त्याची तीव्रता कमी असते या लसीकरणामुळे मृत्यू होतो अथवा इतर आजार होतात या अफवा असून हे लसीकरण सुरक्षित आहे त्यामुळे जनतेनी घाबरून न जाता कोविड लसीकरण करून घ्यावे डॉ सुजाता शंभरकर प्रा आरोग्य केंद्र शंकरपूर)

Leave A Reply

Your email address will not be published.