नको असलेल्या कॉल्स आणि SMS मुळे वैताग आलाय? फोनमध्ये असा अ‍ॅक्टिव्हेट करा DND मोड

नको असलेल्या फोन आणि SMS पासून सुटका करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना DND मोड अ‍ॅक्टिव्हेट करण्याची सुविधा देतात. डू नॉट डिस्डर्ब अर्थात DND (Do Not Disturb) सर्विस अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर मार्केटिंग कॉल्स येणं बंद होईल.

0 0

नवी दिल्ली : तुम्हीही मार्केटिंग आणि जाहिरात कंपन्यांकडून येणाऱ्या सततच्या नको असलेल्या फोन आणि एसएमएसमुळे वैताग आला आहे का? नको असलेल्या फोन आणि SMS पासून सुटका करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना DND मोड अ‍ॅक्टिव्हेट करण्याची सुविधा देतात. डू नॉट डिस्डर्ब अर्थात DND (Do Not Disturb) सर्विस अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर मार्केटिंग कॉल्स येणं बंद होईल.

Vodafone-Idea युजर्स कसा अ‍ॅक्टिव्हेट कराल DND मोड –

– वोडाफोन-आयडियाची डीएनडी सर्विस सुरू करण्यासाठी https://www.myvi.in/dnd या लिंकवर जावं लागेल.

– त्यानंतर वोडाफोन-आयडिया युजर्स त्यांचा नंबर टाईप करुन Get OTP वर क्लिक करा.

– ओटीपी टाकल्यानंतर डीएनडी सेटिंग्स येईल.

– येथून डीएनडी मोड अ‍ॅक्टिव्हेट किंवा डि-अ‍ॅक्टिव्हेट करता येईल.

Airtel युजर्स –

– यासाठी एअरटेल वेबसाईट www.airtel.in वर जाऊन DND पेजवर जा.

– किंवा थेट https://www.airtel.in/airtel-dnd/ या लिंकवरही जाऊ शकता.

– एअरटेल मोबाईल सर्विस सेक्शनमध्ये Click Here ऑप्शनवर क्लिक करा.

– तुमचा एअरटेल नंबर टाका आणि Get OTP वर क्लिक करा.

– OTP टाकल्यानंतर end all ऑप्शनवर क्लिक करा.

Reliance Jio युजर्स –

– फोनमध्ये MyJio अ‍ॅप डाउनलोड करुन लॉगइन करा.

– आता Settings मध्ये जा.

– येथे DND हा पर्याय दिसेल.

– त्यानंतर कंपनी एक लेटर देईल आणि DND मोड 7 दिवसांमध्ये अ‍ॅक्टिव्हेट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.