Toxic Gas Leaks at Bhiwandi: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे टॉक्सिक गॅस गळती, कोणतीही जीवितहानी नाही

भिवंडी परिसरात टॉक्सिग गॅसगळतीची घटना घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

0 7

ठाणे  : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडी येथे शनिवारी (30 एप्रिल) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास टॉक्सिक गॅस गळती (Toxic Gas Leaks at Bhiwandi) झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू, परिसरात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरी परिसराजवळ अशा प्रकारची गळती घडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्घटना होण्याची शक्यता होती.

ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, भिवंडी परिसरात टॉक्सिग गॅसगळतीची घटना घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना भिवंडी येथील खुनी गावातील चिकनीपाडा मैदानावर सल्परडाय ऑक्साईड असलेले काही सिलिंड ठेवण्यात आले होते. हे सिलिंडर एकूण 16 होते. या सिलिंडरपैकी दोन सिलिंडरमधून गॅस बाहेर पडला आणि तो परिसरात पसरला, अशी माहिती कदम यांनी दिली.

दरम्यान, गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात गॅसगळतीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. या घटना छोट्या छोट्या असल्या तरी त्याचे गांभीर्य मोठे होते. दरम्यान, नाशिक येथे नुकतीच ऑक्सिजन टाकीची गळती झाली. एका रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.