
आंतरजिल्हा शिक्षकांच्या नियुक्तीपुर्वी अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या करा.
शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेची निवेदनामार्फत मागणी
शेगांव
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असुन आंतरजिल्हा बदलीने प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये रूजू झालेले आहेत,
सदर आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या शाळेचे नियुक्तीपत्र देण्यापूर्वी जिल्हयातील अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्यांसाठी वेळापत्रक निश्चित करून जिल्हांतर्गत अतिरिक्त असलेल्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये म्हणून रिक्त शाळेवर समुपदेशनाद्वारे स्थानांतर करण्यात यावे,
जिल्हयातील अतिरिक्त शिक्षकावर अन्याय होऊ नये म्हणून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नियुक्तीच्या शाळेचे नियुक्तीपत्र देण्यापूर्वी जिल्हयातील अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया करण्याची मागणी किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.बुलडाणा यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांच्यामार्फत प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे अर्जुन गिरी,अजय जुमळे,प्रशांत नागे,सचिन वडाळ,सचिन गावंडे आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.