प्रसिद्ध अँकर रोहित सरदाना यांचे हार्ट अटॅकने निधन, कोरोना व्हायरसचीही झाली होती लागण

सुधीर चौधरी यानी ट्विट करुन त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

0 79

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले, तसेच त्यांना कोरोनाचीही लागण झालेली होती. दिर्घकाळ ते झी न्यूजमध्ये अँकर होते. रोहित सरदाना सध्या आज तक न्यूज चॅनलमध्ये अँकर म्हणून काम करत होते. सुधीर चौधरी यानी ट्विट करुन त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

सुधीर चौधरी यांनी म्हटले की, ‘थोड्या वेळपूर्वीच जितेंद्र शर्मा यांचा फोन आला. त्यांनी जे म्हटले ते ऐकून हात थरथरत आहेत. आमचे मित्र आणि सहयोगी रोहित सरदाना यांच्या मृत्यूचे वृत्त होते. हा व्हायरस आपल्या किती जवळच्यांना घेऊन जाणार आहे याची कल्पना केली जाऊ शकत नाही. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवाने केलेला अन्याय आहे…!ॐ शान्ति.’

बर्‍याच काळापासून टीव्ही माध्यमांचा चेहरा असलेले रोहित सरदाना सध्या ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवर प्रसारित होणार्‍या ‘दंगल’ या कार्यक्रमाला अँकरींग करायचे. 2018 मध्येच रोहित सरदाना यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही रोहित सरदाना यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.

ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले, ‘मित्रांनो, ही अत्यंत वाईट बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना. ‘

Leave A Reply

Your email address will not be published.