अमरावतीमधील सोयाबीन चोरीचे गूढ उकलले; तपासात धक्कादायक खुलासा

Amravati Truck and soybean Theft: पैशाच्या हव्यासापायी स्वत:चा ट्रक चोरी करण्याचा कट रचून चालकाची हत्या केल्या प्रकरणी अमरावती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

0 8

हायलाइट्स:

  • अमरावती-मोर्शी रोडवरील सोयाबीन चोरीचे गूढ उकलले
  • ट्रक चालकानं ड्रायव्हरच्या साथीनं रचला होता बनाव
  • आरोपींना अटक. १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी

अमरावती: ट्रक चालकाचा खून करून ट्रकसह २५० क्विंटल सोयाबीन चोरून नेल्याच्या प्रकरणाचं गूढ अखेर उलगडलं आहे. या प्रकरणी दोघांना अटक झाली असून पैशाच्या मोहापायी ट्रक मालकानंच हा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी ट्रकमालक नारायण गणेश घागरे (३१) व चालक प्रकाश साहू (३५) यांना अटक करण्यात आली आहे. (Amravati soybean Theft)

नारायण घागरे यानं दोन वर्षांपूर्वी पाच एकर शेत विकून ट्रक घेतले होते. त्याचबरोबर त्यानं कर्ज सुद्धा घेतलं होतं. करोनाच्या टाळेबंदीमुळं फायनान्सचे हप्ते थकले. छिंदवाडा इथं भाड्याच्या घरात राहणाऱ्या घागरेला स्वत:चं नवीन घर बांधायचं होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि थकलेले हप्ते फेडण्यासाठी घागरेसह त्याचे दोन ड्रायव्हर प्रकाश आणि नंदकिशोर अशा तिघांनी ट्रक व सोयाबीन चोरीचा बनाव रचला. ट्रक अकोल्याला गेला की, परतीच्या वेळी नागपूरसाठी सोयाबीनच्या पोत्यांचे भाडे मिळते. ही बाब घागरेसह साहू व नंदकिशोरला माहिती होती. सुमारे महिनाभरापासून ट्रक लुटण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्यांचा हा कट ५ जूनला यशस्वी झाला. मात्र, सगळं काही ठरल्याप्रमाणं झाल्यावर नारायण घागरे आणि प्रकाश साहू या दोघांना एक भीती सतावत होती. त्याचा तिसरा साथीदार नंदकिशोर हा दारूडा होता. दारूच्या नशेत तो कधीतरी आपलं बिंग फोडेल, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं दोघांनी मिळून नंदकिशोरचा खून केला.

चोरी व खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना संशय आला. शेवटी पोलिसांनी घागरे व साहू यांच्या भोवतीच तपास केंद्रीत केला तेव्हा या प्रकाराचा उलगडा झाला. या दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.