दोन महिन्यांत रस्त्यांवर दोन हजारांवर खड्डे

महापालिकेच्या माहितीतून वास्तव उघड

0 4

महापालिकेच्या माहितीतून वास्तव उघड

नागपूर : कधीकाळी गुळगुळीत रस्त्याचे शहर अशी ओळख असलेले नागपूर नंतरच्या काळात खड्डेयुक्त शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. आता महापालिके ने बुजवलेल्या खड्डय़ांची माहिती दिली आहे. त्यानुसार दोन महिन्यात २ हजार २६४ खड्डे  रस्त्यावर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील एका वर्षी ही संख्या  ६ हजार ११५ इतकी होती.  हे सर्व खड्डे आता बुजवल्याचा दावा महापालिके ने के ला आहे.

रस्ते बांधणी, त्यानंतर पडलेले खड्डे बुजवणे यात महापालिके चे दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च होतात. म्हणून के ंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने अनेक रस्ते सिंमेटचे करण्यात आले. तरीही काही रस्ते शिल्लक आहेत. त्यांचे दरवर्षी डांबरीकरण के ले जाते. दोन महिन्यात त्यावर खड्डे पडले. दोन महिन्यात असे २ हजार २३६४ खड्डे बुजवण्याची वेळ महापालिके वर आली यावरून रस्त्याच्या गुणत्तेची कल्पना येते. गेल्या वर्षभरात डांबरी रस्त्यावरील ६ हजार ११५ खड्डे  बुजवण्यात आले. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीनुसार, रस्त्यावर सर्वाधिक खड्डे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातील आहेत.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित आहे. पण अजूनही अनेक रस्त्यावरील खड्डे जैसे थे आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये ४८३ तर हनुमाननगर झोनमध्ये ही संख्या २५७ होती. कळमना उड्डाण पुलाजवळील एचबी नगरातील डांबरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, या भागातील नागरिकांकडून याबाबत नगरसेवकांकडे वारंवार  तक्रार करण्यात आली आहे. नंदनवन, खामला, सहकारनगर, पांडे लेआऊट, देवनगर, चिंचभुवन, सक्करदरा, धंतोली धरमपेठ या ठिकाणच्या डांबरी रस्त्याची अत्यंत वाईट स्थिती आहे. या रस्त्याने वाहन चालवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या भागातील नगरसेवकांकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

पावसाळ्यापूर्वी डांबरी रस्त्याची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोनामुळे  कामे थांबली. आता  कामे सुरू झाली आहेत. पावसाळा संपल्यावर अशा सर्व रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.