भरधाव दुचाकीस्वार नाल्यात कोसळला, जागीच ठार; ठाण्यातील धक्कादायक घटना

0 6

ठाण्यातील कोरम मॉलजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. कोरम मॉल येथे नाल्याचे काम गेल्या काही दिवसांपासून नाल्याचे काम सुरू आहे.

 

ठाणे :  ठाण्यात (Thane) कोरम मॉलजवळ (korum mall) नाल्याचे पडून एका दुचारीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.    भरधाव वेगाने जात असताना नाल्यासमोर कोणतेही बॅरिकेटस आढळून न आल्यामुळे हा तरुण खड्ड्यात कोसळला. जबर जखमी झाल्यामुळे त्याचा जागीत मृत्यू झाला.

ठाण्यातील कोरम मॉलजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. कोरम मॉल येथे नाल्याचे काम गेल्या काही दिवसांपासून नाल्याचे काम सुरू आहे. पावसाचे पाणी साचत असल्यामुळे नाल्याचे काम हाती घेण्यात आले. पण हे काम सुरू असताना कोणतेही सुचना फलक अथवा बॅरिकेटस लावलेले नव्हते. सोमवारी रात्री एका बाईकस्वार या मार्गावरून भरधाव वेगात जात होता. समोर नाला आहे याचा अंदाज न आल्यामुळे तरुण बाईकसह नाल्यात कोसळला. भरधाव वेगात असल्यामुळे नाल्यात कोसळल्यानंतर तरुण जबर जखमी झाला आणि त्यातच त्याचा जीव गेला.

विभागातील नागरिकांनी नाल्यात पडलेल्या माणसाला पाहून आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवले असता घटना स्थळी आपत्ती व्यवस्थापन दल, स्थानिक पोलीस प्रशासन येऊन मयत दुचारीस्वराला बाहेर काढण्यात आले. या तरुणाची ओळख अद्याप पडली नाही. या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पावसाचे पाणी साचू नये म्हणून या नाल्याचे काम सुरू असून या ठिकाणी बॅरिकेट लावले नसल्याचे  स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मुंबई आग्रा हायवेच्या बाजूलाच हे काम सुरू असून या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी कोणतेही सुरक्षा गार्ड या इथं उपस्थित नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.