पोलिसी खाक्या, भर शिवाजी चौकात बुलेटच्या 114 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवला, तरुणांना चांगलाच धडा

रॉयल एन्फिल्ड म्हणजेच बुलेटच्या कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर उल्हासनगरात जोरदार कारवाई करण्यात आली (Ulhasnagar Police run road roller on illegal silencer of Royal Enfield bikes).

0 13

उल्हासनगर (ठाणे) : रॉयल एन्फिल्ड म्हणजेच बुलेटच्या कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर उल्हासनगरात जोरदार कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बुलेटचे सायलेन्सर काढून त्यावरून चक्क रोडरोलर फिरवून सायलेन्सरचा चक्काचूर केला. विशेष म्हणजे उल्हासनगरात भर शिवाजी चौकात ही कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी तब्बल 114 बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरचा चक्काचूर केला (Ulhasnagar Police run road roller on illegal silencer of Royal Enfield bikes).

नेमकं प्रकरण काय?

बुलेट या दुचाकीला कंपनीने दिलेलं सायलेन्सर काढून अनेकजण मॉडिफाईड सायलेन्सर टाकतात. या सायलेन्सच्या आवाजामुळे अक्षरशः कानठळ्या बसतात आणि ध्वनी प्रदूषण सुद्धा होतं. या सायलेन्सरला वाहतूक विभागाची परवानगी नाही. याबाबत हिराली बुफाऊंडेशन या संस्थेच्या वतीनं सरिता खानचंदानी यांनी मोठा पाठपुरावा केला होता. यानंतर या सायलेन्सर विरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली (Ulhasnagar Police run road roller on illegal silencer of Royal Enfield bikes).

याप्रकरणी उल्हासनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी मागील काही दिवसात धडक कारवाई करत तब्बल 114 बुलेट गाड्यांचे सायलेन्सर जप्त केले होते. या सर्व सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले आहे. उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या अतिशय गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर हे सायलेन्सर ठेवून त्यावरून रोलर फिरवण्यात आला. लोकांना ही कारवाई कळावी, यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण निवडण्यात आलं.

पोलिसांची प्रतिक्रिया

या कारवाईवेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्यासह वाहतूक पोलीस मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कारवाईमुळे उल्हासनगरात ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना संदेश जाईल आणि भविष्यात हे सायलेन्सर कुणी बसवणार नाही, असा विश्वास यावेळी पोलीस उपयुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

यापुढे जे गॅरेज चालक असे सायलेन्सर लावून देतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. तर उल्हासनगरात शहर हे सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असणारं शहर असून या कारवाईनंतर आता तरी शहरातलं ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा हिराली फाऊंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.