गोंदियात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, चंद्रपुरातही मुसळधार
भाजीपाला, रब्बी पिकांचे नुकसान
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने विदर्भात जोरदार हजेरी लावली. आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी बरसत आहे.
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने रविवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पाऊस सुरुच आहे. यामुळे, रब्बी पिके आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर, पुढील तीन दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. शुक्रवारनंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.