यूपी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार:उत्तर प्रदेशात हायकोर्टाने लावला लॉकडाऊन; योगींचा नकार

तामिळनाडूसह केरळमध्येही रात्रीच्या संचारबंदीची घोषणा

0 2

उत्तर प्रदेशात अलाहाबाद हायकोर्टाने सोमवारी लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर नगर आणि गोरखपूरमध्ये २६ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्याचा अंतरिम आदेश दिला. न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मांच्या पीठाने हा आदेश देत राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर आसूड ओढले. कोर्ट म्हणाले, लोकांना आैषधे व ऑक्सिजन मिळत नाहीये. यासाठी सत्तेच्या सर्वाेच्च स्थानी बसलेले लोकच जबाबदार आहेत. कोर्टाने पंचायत निवडणुकांवरही आक्षेप घेतला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात लॉकडाऊन लावणार नसल्याचे म्हटले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने निवेदन जारी केले. त्यात म्हटले की, सरकार लॉकडाऊन लावणार नाही. कोर्टाच्या आदेशाला सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देईल.

तामिळनाडूसह केरळमध्येही रात्रीच्या संचारबंदीची घोषणा

  • तामिळनाडूमध्ये पलानीसामी सरकारने मंगळवारपासून राज्यात रात्रीची संचारबंदी आणि दर रविवारी पूर्ण लाॅकडाऊनची घोषणा केली.
  • केरळमध्ये सरकारने दोन आठवडे रात्रीची संचारबंदी लावली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालय – हातात सत्तेची धुरा असलेलेच या आरोग्य आपत्तीसाठी जबाबदार आहेत. आपल्याकडे निवडणुकांवर खर्चण्यासाठी बक्कळ पैसे आहेत, सार्वजनिक आरोग्यासाठी मात्र खूप कमी बजेट आहे, हे पाहून एखाद्याला हसू येईल.

दिल्लीत सहा दिवस लॉकडाऊन, मद्यप्रेमींची झुंबड
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात ६ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर दारूच्या दुकानांवर एकच झुंबड उडाली. काही ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून लोकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून घेतले. इतर ठिकाणी मात्र मद्यप्रेमींनी तोबा गर्दी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.