मित्राच्या लग्नाला गेलेल्या तरुणाला गोळी झाडून संपवलं, प्रेमप्रकरणातून हत्येचा संशय

(Uttar Pradesh Man in Friends Wedding killed)

0 34

लखनौ : मित्राच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी गेलेल्या युवकाची गोळी झाडून हत्या करण्यात आला. उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सकाळी तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला. मृतदेहाशेजारीच तरुणाची बाईक आणि बंदूकही सापडली. (Uttar Pradesh Crime Man went for Friends Wedding killed)

रस्त्याशेजारी तरुणाचा मृतदेह सापडला

22 वर्षीय आदित्य या तरुणाचा हा मृतदेह आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डावरुन मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी आदित्यच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती दिली. शमशाबादमधील पहाडपूर भागाचा तो रहिवासी आहे. पोलिसांनी आदित्यचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

प्रेम प्रकरणातून हत्येचा संशय

प्रेम प्रकरणातून आदित्यची हत्या झाल्याची चर्चा गावात रंगली आहे. मित्राच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी आदित्य दोन दिवसांपूर्वी बाईकने गेला होता. रविवारी सकाळी परत येणार असल्याबाबत शनिवारी रात्री त्याने कुटुंबीयांना कळवलंही होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी शमशाबाद भागातील चिलसरा मार्गावर तो मृतावस्थेत आढळला.

गावातील तरुणांवरच कुटुंबाचा आरोप

आदित्यचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. गावातील काही जणांनीच आपल्या मुलाचा जीव घेतल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून हत्येच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. प्रेम प्रकरणातून हत्येचा आरोप होत असल्याने ती बाजूही पोलीस तपासून पाहणार आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.