उत्तराखंडमध्ये ढगफुटी:उत्तरकाशी आणि रुद्रप्रयागमधील अनेक घरे ढिगाऱ्याखाली गेली, अनेकांनी उंच ठिकाणी जाऊन वाचवले स्वतःचे जीव

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत दिले मदतीचे आदेश

0 13

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये सोमवारी ढगफुटी झाली. ही घटना चिन्यालीसौड़ ब्लॉकच्या कुमराडा गावात घढली. या ढगफुटीमुळे गावातील कालव्यातील पाण्याची पातळी वाढली आणि पाणी अनेक घरांमध्ये घुसले. पाण्यासोबत आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात अनेक घरे दबल्या गेले. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील नरकोटामध्येही ढगफुटीमुळे डोंगरावरची माती वाहून घरांमध्ये घुसली. ही दुर्घटना घडली तेव्हा लोकांनी उंच ठिकाणी जाऊन आपला जीव वाचवला.

पाणी आणि मात/चिखलाचा प्रवास एक तास सुरू होता. यामुळे अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. उत्तरकाशी जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की, ढगफुटी झाल्यामुळे अनेकांच्या घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, टिहरीच्या अनेक भागांमध्येही जोरदार पाऊस पडला आहे. येथे SDRF आणि पोलिसांचे बचावकार्य सुरू आहे. उत्तराखंडमध्ये मागील 4 दिवसांपासून वातावरण खराब झाले आहे. डोंगराळ भागात सतत पाऊस आणि गारा पडत आहे.

मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आदेश दिले

दोन जिल्ह्यात ढगफुटीची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी उत्तरकाशी आणि रुद्रप्रयागच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली आणि दुर्घटनेत नुकसान झालेल्या लोकांना आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.