प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीचे टाकळी विरो येथे लसीकरण संपन्न

0 5

शेगांव :
प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत ग्राम टाकळी विरो येथे वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.तृप्ती लखोटिया ( निरिक्षण व तपासणी )आरोग्य सहाय्यक आर.पी.निखाडे,आरोग्य सहाय्यीका श्रीमती डिप्टे,आरोग्य सेविका श्रीमती यु.बी.मुंडे,मनिषा ढोके (लस टोचक) आरोग्य सेवक एस.बी.सरोदे,तुषार भांडे (नोंदणी विभाग) यांनी अथक परिश्रम घेऊन कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरण शिबिर यशस्वी केले.
संपन्न झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरामध्ये फ्रण्ट लाईन वर्कर पहिला डोस ६,वयोगट ४५ पेक्षा जास्त असलेले १०२,वयोगट ६० पेक्षा जास्त असलेले २८ लाभार्थी व दुस-या डोसाचे
४५ पेक्षा जास्त असलेले ८,वयोगट ६० पेक्षा जास्त असलेले ६ लाभार्थी असे एकूण १५० लाभार्थ्याचे कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रशासकीय कर्मचारी व गावातील लोक प्रतिनिधी यांनी गावामध्ये कोरोना संसर्ग लसीकरणसंदर्भात आशा वर्कर छाया इंगळे,रेणुका काळे,अंगणवाडी सेविका श्रीमती उन्हाळे,कु.काळे,मदतनीस श्रीमती इंगळे, सावळे,सरपंच नंदलाल उन्हाळे,ग्रामसेवक सावरकर,तलाठी मोहोड,उच्चश्रेणी मुख्याध्यापक दिपक दामोदर,पोलीस पाटील सुनिल उन्हाळे यांनी जनजागृती करण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

” कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतलेल्यांपेक्षा दोन डोस घेतलेल्या एकाही रुग्णाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेला नाही. त्या
व्यक्तीला पुन्हा कोरोना
झाला तर तो सहजपणे कोरोना संसर्गावर मात करू शकतो. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रत्येकाने करून घेणे खूप गरजेचे असून,प्रत्येकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अथवा आपल्या गावामध्ये संपन्न होत असलेल्या शिबिरामध्ये सहभागी होऊन लस टोचून घ्यायला
हवी. ”
– आर.पी.निखाडे
आरोग्य सहाय्यक,प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव

Leave A Reply

Your email address will not be published.