वायरल विडिओ! डॉक्टराने घातली कोरोना रुग्ण महिलेची वेणी, व्हिडिओ पाहून आयपीएस अधिकारी म्हणतो..

0 1

नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट वायरल होईल सांगता येत नाही. अवघ्या काही क्षणातच सोशल मीडियामुळे अनेकांचे आयुष्य बदलून गेलेले आपण ऐकले किंवा पाहिले असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे. ज्यात एक डॉक्टर कोरोना रूग्णाची चक्क वेणी घालताना दिसत आहे. त्यामुळे या डॉक्टरचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. दरम्यान हा व्हिडिओ गिर सोमनाथ जिल्ह्यातील आहे.

व्हिडीओमधेय पीपीई किट परिधान केलेली एक डॉक्टर आहे, जी समोर बेडवर बसलेल्या महिलेला व्यायाम कसे करावे हे शिकवत आहे. ती महिलासुद्धा पाहून व्यायाम करत आहेत. काही वेळानंतर ती डॉक्टर महिलेची वेणी देखील घालून देत असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयएएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विट हँडल वरून शेअर केला आहे. तसेच त्याला त्यांनी फक्त उपचारच नाही तर कौटुंबिक प्रेमही आमचे कोरोना वॅरियर्स लोकांना वाटत आहेत. असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, वैद्यकीय पथक अत्यंत तणावग्रस्त वातावरणात माणसांची सेवा करत आहे. त्यामुळे घरी रहा, कोरोना केसेस वाढू न देता मदत करा, असे आवाहन ही दीपांशु काबरा यांनी सर्वांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.