चंदीगड: उद्यापासून मोहालीमध्ये (Mohali Test) श्रीलंकेविरुद्ध (India vs Srilanka) सुरु होणारा पहिला कसोटी सामना टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे. विराट कोहलीचा (Virat kohli) 100 वा कसोटी सामना हा भारतीय क्रिकेटसाठीही खास क्षण असणार आहे.
सध्याचा भारतीय क्रिकेटमधला एका मोठा स्टार आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. विराट कोहलीसाठी हा क्षण ऐतिहासिक बनवण्यासाठी बीसीसीआयने खास तयारी केली आहे. स्वत: विराट कोहली सुद्धा या सामन्यात इतिहास रचू शकतो. सर्वांनाच विराट कोहलीच्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा आहे.
विराट कोहलीसाठी 71 नंबर मोहालीमध्ये कमाल करु शकतो. जाणून घ्या काय आहे कनेक्शन. विराट कोहलीच्या फलंदाजीकडे उद्या सगळ्यांच्या नजरा असतील.