IPL 2021 : मॅक्सवेलची दमदार खेळी, सेहवागने बघता बघता प्रिती झिंटाला ट्रोल केलं!

मॅक्सवेलची खेळी पाहून प्रितीच्या तोंडी 'ओ बेटा जी.....' हे गीत नक्कीच असेल, असं सेहवागला सुचवायचं आहे. (Virendra Sehwag Share A Funny Meme Glenn Maxwell Inning troll Preity Zinta)

0 0

मुंबई :  आयपीएलच्या (IPL 2021) 10 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 38 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुकडून ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेलने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 49 चेंडूत 78 धावा फटकावल्या. त्याची ही खेळी पाहून भारताचा दिग्गज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) खूष झालाय. सेहवागने एक मजेशीर ट्विट करत मॅक्सवेलचं कौतुक केलं आणि बघता बघता पंजाब संघाची मालकीन प्रिती झिंटाला (Preity Zinta) ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. (Virendra Sehwag Share A Funny Meme Glenn Maxwell Inning troll Preity Zinta)

मॅक्सवेलची कोलकाताविरुद्ध धमाकेदार खेळी

बंगळुरुच्या दोन विकेट्स लवकर पडल्यानंतर क्रीजवर ग्लेन मॅक्सवेलने पाऊल ठेवलं. त्याने सुरुवातीपासून अतिशय व्यवस्थित खेळ केला. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात त्याने 9 चौकार आणि 3 षटकारांसह 49 चेंडूत 78 धावा फटकावल्या. ए बी डिव्हिलियर्सच्या साथीने त्याने शानदार खेळी केली. त्याची ही खेळी पाहून सेहवागला आनंद अनावर झाला. सेहवागने एक ट्विट करत मॅक्सवेलचं कौतुक केलं आहे.

सेहवागकडून प्रितीला ट्रोल करण्याचा प्रयत्न

सेहवागने ‘लुडो’ या चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘अलबेला’ चित्रपटातील गाण्याद्वारे मॅक्सवेलच्या आयपीएलमधील याअगोदरच्या संघांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मॅक्सवेलची खेळी पाहून प्रितीच्या तोंडी ‘ओ बेटा जी…..’ हे गीत नक्कीच असेल, असं सेहवागला सुचवायचं आहे. याचसोबत कॅप्शनमध्ये सेहवागने लिहिलं आहे की, “अखेर मॅक्सवेलला आयपीएलमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करताना पाहून आनंद झाला”.

मॅक्सवेलचं आयपीएल 2021 मध्ये थाटात प्रदर्शन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना मॅक्सवेलने सलग दोनदा अर्धशतकी खेळी केल्या आहेत. आयपीएलमध्ये यंदा त्याने खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये 176 ( पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 39, दुसऱ्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 59 आणि तिसऱ्या सामन्यात कोलकात्याविरुद्ध 78) धावा फटकावल्या आहेत. यंदाच्या स्पर्धेतील मॅक्सवेलचा परफॉर्मन्स पाहून कर्णधार विराट, संघातील इतर सहकारी, संपूर्ण फ्रँचायजी, तसंच क्रीडा समीक्षक त्याचं कौतुक करु लागले आहेत.

सेहवाग मॅक्सवेलला 10 कोटींची चीअरलीडर म्हणाला होता…

आयपीएल 2020 नंतर सेहवागने मॅक्सवेलला 10 कोटी रुपयांची चीअरलीडर म्हटलं होतं. आयपीएल 2020 मधील मॅक्सवेलची कामगिरी पाहून विरेंद्र सेहवागने मॅक्सवेलवर टीका केली होती. आयपीएल 2020 मध्ये मॅक्सवेलने 13 सामन्यांमध्ये केवळ 108 धावा जमवल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेत तो एकही षटकार फटकावू शकला नव्हता. मॅक्सवेलचा हा परफॉर्मन्स पाहून सेहवाग म्हणाला होता की, 10 कोटींची चीअरलीडर किंग्ज इलेव्हन पंजाबला भारी पडली. मॅक्सवेल दरवर्षी असंच करतो, तो खूप कामचोर झाला आहे. तेच त्याचं रुटीन आहे. यंदाच्या (2020) सीझनमध्ये तर त्याने स्वतःचाच रेकॉर्ड मोडित काढला आहे. यालाच म्हणतात हायली पेड व्हेकेशन (Highly Paid vacation).

 

Leave A Reply

Your email address will not be published.