शंकरपूर ला विकासाची प्रतीक्षा..

लोकप्रतिनिधीचे दर्शन दुर्लभ..

0

शंकरपूर

शंकरपूर हे गाव जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणून ओळख निर्माण केलेली आहे मात्र आजही पाहिजे त्या प्रमाणात या गावाचा विकास झालेला दिसून येत नसून गावाच्या परिसरात जवळपास 28 गावे येतात गावातील लोकसंख्या 12 हजारचा वर असून परिसरातील लोकसंख्या 50000 च्या जवळपास आहे गेल्या बावीस वर्षामध्ये या परिसरातील जनतेनी आमदार, राज्य,जिल्हा परिषद अध्यक्ष ,जि.प.सदस्य, जि.प.सदस्या, पं. समिती उपसभापती,सदस्य, जि.प.समाज कल्याण सभापती जनतेने निवडून देले मात्र आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणं या क्षेत्राचा विकास झालेला नसून विद्यमान आमदार आणि खासदार यांचे सुद्धा या क्षेत्राकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे असा प्रश्न जनतेला पडलेला आहे…

खासदारांची निवडणूक होवून जवळपास दोन वर्षे पूर्ण उलटून गेले पण खासदार साहेबांचे परिसरामध्ये पत्ता दिसत नाही,खासदार असून सुद्धा नसल्यासारखे जनतेला वाटत आहे, क्रांतिभूमी, विधानसभा शेत्र चिमूर अंतर्गत नेरी,खडसंगी, भिसी, शंकरपूर ही मोठी लोकसंख्या असलेले गावी आहे.. शंकरपूर गावात अजून पर्यंत कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक, तसेच कोणत्याही बँकेचे एटीएम नसल्यामुळे पैसे काढण्याकरिता विद्यार्थी, पेन्शन धारक कर्मचारी, कर्मचारी,व्यापारी वर्ग यांना बाहेरगावी आंबोली येथे महाराष्ट्र बँकेत जावे लागते तसेच या ठिकाणी जाण्यासाठी कोणते प्रकारचे वेळेवर वाहन नसल्यामुळे बाहेर जिल्ह्यातील भंडारा मधील “भुयार’ या ठिकाणी जाण्यासाठी जनतेला खूप प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे लोकसंख्या, विकासाच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा विचार केला तर इथे ग्रामीण रुग्णालयाची तसेच पोलीस स्टेशनची जुनी मागणी अनेक वर्षापासून राजकीय वादातून स्वप्न भंग पडलेली आहे..

तसेच शंकरपूर मध्ये पूर्वीपासून pwd चे कॉटर व मोकळी दोन हेक्टर वर जागा उपलब्ध आहे याठिकाणी जूनियर इंजीनियर पूर्वी राहत होते परंतु आज ही कॉटर बेवारस पडलेली असून जीर्णावस्थेत आहेत या कॉटरला आजही जूनियर इंजीनियर कधी मिळणार याकडे येतील जनता आतापर्यंत वाट बघत आहे..

परिसरातील सुशिक्षित बेरोजगारीची समस्या खूप दिवसापासून भेडसावत आहे गावालगत आजगाव, पाचगाव,खैरी, पांजरेपार,कोल्हारी,कानपा मिळून काही वर्ष अगोदर महाजनको च्या पावर प्लांटला मंजुरी मिळाली असल्याचे लोकप्रतिनिधी कडून सांगण्यात आले आणि तो तयार होणारच असा विश्वास देण्यात आले होता मात्र लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही अपेक्षा धुळीस मिळाली व परिसरातील जनतेची घोर निराशा झाली, तसेच चिमूर, कानपा,वरोरा रेल्वे मार्ग होणार असे आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये येथील परिसरातील जनतेला दिले होते परंतु आतापर्यंत ही सुद्धा अपेक्षा धुळीस मिळाली आहे..

या परिसरामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून परिसरामध्ये धान, कापूस, सोयाबीन,मिरची, तुर, पिके घेतली जातात येथील शेतकऱ्याची करोडो रुपयाची हिरवी मिरची दिल्ली, भोपाल, मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी ठिकाणी जाते परंतु शंकरपूर या ठिकाणी अशी कुठलीही बाजारपेठ उपलब्ध नाही शेतक-यांना कापूस हिंगणघाट, भिवापूर,उमरेड इतर ठिकाणी न्यावा लागतो बाजारपेठ उपलब्ध झाल्यास परिसरातील बेरोजगार मुलांना तसेच शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल परिसरातील बेरोजगार युवकांचे रोजगाराकरिता नागपूर, पुणे, गुजरात,नाशिक बाहेर जिल्ह्यातील स्थलांतरण थांबण्यास मदत होईल…..

Leave A Reply

Your email address will not be published.