कोल्हापूर: मुसळधार पावसात भिंत कोसळून कोल्हापूरात तिघे ठार, इतर नागरिकांचा शोध सुरू

मुसळधार पावसात भिंत कोसळून कोल्हापूरात तिघे ठार, इतर नागरिकांचा शोध सुरू

0 6

कोल्हापूर: मॉन्सूनपूर्व पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला गुरुवारी तडाखा दिला. गडहिंग्लज तालुक्यातील मौजे मुगळी येथे पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तीन जण ठार झाले आहेत. मृतांची ओळख अजून पटली नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडून यासंबंधी माहिती मिळाली आहे. मयत झालेल्यांमध्ये दोन महिला एक पुरुषाचा समावेश आहे.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्या. ग्रामीण भागात भिंत खचण्याचे प्रकार घडले.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर नागनूरचे हे तिघेही पोल्ट्री फार्मच्या भिंतीच्या आडोशाला थांबले. पावसाचा प्रचंड जोर होता. घटनास्थळी मिळालेल्या माहिती नुसार नांगणुर (ता. गडहिंग्लज) येथील अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) त्यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे ती माहेरी नांगनूर येथे राहत. गुरुवारी अजित, गिरीजा व त्यांच्या दुसऱ्या भावाची पत्नी संगीता बसाप्पा कांबळे (वय ४५, रा. नांगनूर) हे तिघेही गिरीजा हिच्या सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते. दरम्यान, ते गावी परतत असताना जोरदार पावसाला पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी त्यांनी मुगळीपासून जवळ असलेल्या नूल मार्गावर असलेल्या भीमा शंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसरा घेतला. यावेळी वादळाच्या वेगाने अचानक भिंत कोसळून तिघेही गाडले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.पावसाचा जोर ओसरल्यानंतर अन्य नागरिकांनी त्या व्यक्तींचा शोध घ्यायला सुरुवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.