वर्धा जिल्हा अनलॉक:सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

प्रत्येक दुकानदार व ग्राहकांनी मास्क लावणे बंधनकारक राहील.

0 2

जिल्ह्यात कोरोना विषाणुचा सकारात्मक दर १० टक्के पेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध व प्राणवायू खाटा ४० टक्के पेक्षा कमी भरलेले असल्याने, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा थोड्या प्रमाणात अनलॉक झाला असून,७ ते १ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वर्धा नगर पालीका व लगतच्या ११ ग्रामपंचायती, पुलगांव नगर पालिका, व लगतच्या २ ग्रामपंचायती, हिंगणघाट नगर पालीका व लगतच्या ४ ग्रामपंचायत, या क्षेत्रामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तु व सेवा यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच इतर सर्व दुकाने व सेवा सोमवार, मंगळवार, व बुधवार या दिवशी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत चालु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील उर्वरीत भागात सर्व अत्यावश्यक तसेच इतर सर्व प्रकारची वस्तु व सेवा यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीत चालु राहणार आहेत,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.

प्रत्येक दुकानदार व ग्राहकांनी मास्क लावणे बंधनकारक राहील. प्रत्येक दुकानासमोर हॅन्ड वॉश सुविधा किंवा सॅनिटायझर ठेवणे आवश्यक राहील. दुकानाबाहेर ग्राहकांसाठी शारीरिक अंतर राहण्यासाठी खुणा करण्यात याव्या. दुकानदारांनी वेळोवेळी दुकानाचे परिसर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. दुकानात एकावेळी एकाच ग्राहकास प्रवेश राहील. जिल्हा अनलॉक होण्याच्या मार्गावर असून,रुग्ण संख्येत घट होत आहेत.

दुकानांना / आस्थापनांना पुरवठा केला जाणाऱ्या वस्तुंच्या वाहतुकीवर कोणतेही निबंध राहणार नाही. मात्र दुकानांना ठरवुन दिलेलया वेळे नंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना माहामारीच्या आपत्ती जोपर्यंत अस्तीत्वात आहे तो पर्यंत संबधीत दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच या पुर्वी निर्गमीत आदेशा प्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व उद्योग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचाऱ्यांना निगेटीव्ह आरटी पीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता १५ दिवसांकरीता) निगेटीव्ह अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.