म्युकोरमायकोसिस म्हणजे काय?

वाचा सविस्तर

0 82

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत

म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे.

म्युकोरमायकोसिस कसा पसरतो?
म्युकोरमायकोसिस हा असा आजार आहे, ज्याद्वारे श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात. बहुधा फुफ्फुसातील आणि त्वचेमध्ये या फंगल इंफेक्शनची सुरुवात होते.

याची लक्षणे कोणती?

 • तीव्र डोकेदुःखी
 • अंगात सतत बारीक ताप
 • गालावर सूज किंवा बधिरपणा येणे
 • नाक गळणे
 • जबड्यातील हिरड्यांवर पू असलेल्या पुळ्या येणे
 • वरच्या जबड्यातील दातांचे हलणे
 • जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे
 • वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे

आजार टाळण्याचे उपाय

 • तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा वॉश देणे.
 • मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड आणि इतर इंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे.
 • रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे.
 • लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे.

(Mucormycosis fungal infection after recovered from Covid-19)

[टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.]

[मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.]

Leave A Reply

Your email address will not be published.